Biography

Sayali Darp
मैत्री, या चिरकालीन विषयाच्या छटा उलगडणारं, "मैत्रीचे अवकाश" हे सायलीचं पाहिलंच मराठी पुस्तक. शाळेतल्या मैत्रिणींची, वेगवेगळ्या अनुभवातून तावून सुलाखून निघालेली, बदलत जाणारी मैत्री, दोन जिवलग मित्रांना द्यावी लागणारी मैत्रीची परीक्षा, असे अनेक पैलू आपल्याला या पुस्तकात सापडतात. गोष्टीतील पात्रे जरी काल्पनिक असली, तरी ती आपल्याला आपल्या एखाद्या मित्राची आठवण हमखास करून देतात. निसर्ग, पुस्तकं, नृत्य, प्रवास... अशा विविध गोष्टीनी सायलीचं भाव विश्व समृद्ध झालं आहे. मराठीवर विशेष प्रेम करणाऱ्या सायलीच्या, विविध गोष्टी, कविता, लेख, प्रकाशित झाले आहेत. तिच्या काही गोष्टी व लेखनाला बक्षिसे देखील मिळाली आहेत. या शिवाय तिची दोन इंग्रजी पुस्तके देखील प्रकाशित करण्यात आली आहेत. सायलीचे इतर लेखन वाचण्यासाठी वेबसाईट ला भेट द्या: www.sayaliworks.com


