Swapnanchya Pankhawar Komalchi Kavyamay Rachna

350.00


Back Cover

लेखिकेचे मनोगत मी ९ वर्षांची असताना मला एकांत अवडू लागला होता. मी एकटं बसून बरंच काही लिहायचे माझा आनंद, राग, दुःख सगळं काही एखाद्या कागदावर व्यक्त करायचे. पण लिहिता लिहिताच अचानक काही ओळी सुचयच्या आणि त्या यमक असायच्या कस ते माहित नाही.

Description

लेखिकेचे मनोगत मी ९ वर्षांची असताना मला एकांत अवडू लागला होता. मी एकटं बसून बरंच काही लिहायचे माझा आनंद, राग, दुःख सगळं काही एखाद्या कागदावर व्यक्त करायचे. पण लिहिता लिहिताच अचानक काही ओळी सुचयच्या आणि त्या यमक असायच्या कस ते माहित नाही. अशी सवय कधी लागली आठवत नाही पण हळूहळू कविता लिहायची सवय लागली. अश्या कविता सुचत गेल्या. मी सगळ्यात प्रथम कविता आमच्या वालावलकर टीचरांना दाखवली होती ती कविता ३ मिनिटांची होती. आणि ती त्यांच्यावरच लिहिली होती. त्यांना आनंद झाला. मग वालावलकर टिचरांमुळे माझी ओळख झाली, फदाले टिचरां सोबत पण हा, या सुद्धा कवी, गायिका,शिक्षक आणि लेखिका आहेत. त्यांच्या कविता सरळ मनातून उमटून, मनाला भिडणाऱ्या आहेत. आणि कवितांमधुन चुका काढून त्यांच्यामुळेच माझी थोडी सुधारणा झाली. नंतर ओळख झाली सपकाळे सरांशी माझं पुस्तकं बनणं हे माझ्या ध्यानी मनी पण नव्हता आणि हे शक्य केल ते सपकाळे सरांनी. खरंतर पूर्ण शाळेतच यांच्यासारखं कोणीच भेटणार नाही. सर सुद्धा लेखक आहेत. माझ्या इंग्लिश कविता बनणं यात सुद्धा सरांचा हात आहे. सरांविषयी आता काय लिहू. सगळ्यांनाच माहित आहे सर कसे आहेत ते. मला कोंबडू नावाने हाक मारणारे ते पहिले आहेत. मम्मीने पण कविता वाचून प्रतिक्रिया दिली. काही चुका काढल्या होत्या… पण तिला माझ्यापेक्षा जास्त मोठ्या मोठ्या लेखकांचे लेख, कथन, कविता, ओव्या वाचायला आवडतात. काही भाग मम्मी आणि पप्पाना पण आवडले. आणि पुस्तकाला जी प्रस्तावना लाभली आहे ती आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. नीलिमा टेकाडे मॅडम यांची आहे. त्यांनी पण वेळ काढून मदत केली, म्हणून सरांकडून माझ्याकडून त्यांचे खूप आभार. वाचकांना एक सांगावं वाटतय मला माहित आहे, पुस्तकं वाचण्याचा बऱ्याच जणांना कंटाळा येतो, मोबाईलवरच वाचन झालय पण त्यामुळे डोळ्यांना, मेंदूला त्रास होतो. वाचन हे मानवी आयुष्यात महत्वाचं आहे आणि ते केलंच पाहिजे. थोडं थोडं का होईना वाचन करायला हवं. या पुस्तकात काहींना चुका भेटतीलच पण कदाचित काही कविता आवडतील. सगळ्यांनीच खूप खूप छान मदत, प्रोत्साहन, मार्गदर्शन केल म्हणून सगळ्यांचे आभार. पण पुस्तक अस्तित्वात आहे ते सपकाळे सरांमुळे. आमच्या शाळेला किंवा मला लाभलेले सगळेच शिक्षक खूप गोड आणि छान आहेत. सगळ्यांविषयी मी शेवटी काहीतरी लिहिलंय खरंतर ती कविता नाहीच. जसं मार्गदर्शन तुम्ही आता करताय तसाच करत राहा आणि तुमचा आशीर्वाद सोबत असूद्यात. कस्तुरी विषयी काय सांगू! अगदी एखाद्या बहिणीसारखी ती वागते. तिचे शब्द पुस्तकात येण हीच पुस्तकाची खरी शोभा वाटतेय. लेखिका कोमल लक्ष्मण बारवे.